⚫ महिला अथवा पुरुष कोणीही अशा प्रकारे वितरक प्रतिनिधी होऊ शकतात.
⚫ पितांबरी ग्राहक मंचाचे वितरक प्रतिनिधी होण्यासाठी आपले संपूर्ण नांव, पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच अनामत रक्कम रुपये १००/- (रुपये शंभर मात्र) कंपनीकडे भरणे अनिवार्य असेल. (अनामत रक्कम तीन महिन्यांनी प्रवर्तक / वितरक प्रतिनिधीला परत देण्यात येईल).
⚫ आपल्या ओळखीच्या कमीतकमी १० आणि जास्तीत जास्त कितीही व्यक्तींना मेंबर करुन दर महिना त्यांना लागणाऱ्या उत्पादनांची यादी मेंबर कडून घेऊन कंपनीकडे यादी आणि पैसे जमा करावे लागेल.
⚫ यादी आणि पैसे कंपनीकडे जमा झाल्यानंतर आपल्या मेंबर्सनी ऑर्डर केलेल्या उत्पादनांची डिलिव्हरी प्रवर्तक / वितरक प्रतिनिधीच्या घरी केली जाईल आणि त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
⚫सर्व ग्राहकाच्या ऑर्डरचे एकत्रित पॅकेट वितरक प्रतिनिधीच्या घरी पोहोचल्यानंतर त्या त्या ग्राहकांचे पॅकेट परस्परांच्या सोयीनुसार (वितरक प्रतिनिधी आणि ग्राहक) घेऊन जाण्याची जबाबदारी ग्राहकांची असेल आणि यासाठी कोणत्याही प्रकारची अतिरिक्त रक्कम कंपनीकरून दिली जाणार नाही.
⚫ ग्राहकांना उत्पादनांच्या छापील किमतीवर १० टक्के सूट मिळेल तर वितरक प्रतिनिधीला त्यांच्या ग्राहकांकडून आलेल्या ऑर्डरच्या छापील किमतीवर १५ टक्के कमिशन देण्यात येईल.
⚫ कंपनीने ग्राहकांसाठी नियमित करुन देलेली सूट वितरकांनी ग्राहकांना देणे बंधनकारक असेल.
⚫आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पितांबरीची दर्जेदार उत्पादने पोहोचवून त्यांना पितांबरीचे नियमित ग्राहक करण्याची जबाबदारी वितरकाची असेल आणि त्यासाठी आवश्यक प्रॉडक्ट्सची माहिती तसेच अन्य छापील साहित्य देण्याची जबाबदारी कंपनीची असेल.
⚫ वर नमूद केलेल्या सर्व अटींचे पालन करण्याची जबाबदारी प्रवर्तक / वितरक प्रतिनिधीची असेल.
Ms. Nisha Sharma: +91-7777026698 / Toll free No: 1800 103 1299