गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ ग्राहकांच्या मनावर पितांबरीने अधिराज्य गाजवले. विविध अभिनव उत्पादने आणि उत्तम दर्जाची गुणवत्ता यामुळेच पितांबरी घराघरामध्ये पोहोचली. भारताबाहेरही अनेक देशांमध्ये या उत्पादनांची निर्यात होते.

उद्योग विस्तारासोबत उद्गामशीलतेलाही पितांबरी नेहमीच प्रोत्साहन देते. याचाच एक भाग म्हणून पितांबरी घेऊन येत आहे शॉपी फ्रँचायसी. दुकानदारांकडे उपलब्ध असलेल्या जागेचा व्यापारी उपयोग करण्याची ही योजना पितांबरीने आणली आहे. यात सहभागी होणारा दुकानदार प्राथमिक स्वरूपात आणि सोप्या पद्धतीने पितांबरीच्या विक्रीवाढीचा सहाय्यकच होणार आहे. पितांबरीची दर्जेदार नवीन उत्पादने खूप कमी दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. त्याशिवाय पितांबरीची अनेक नवनवीन उत्पादने बाजारात येत आहेत. या उत्पादनांची जाहिरातदेखील पितांबरी करीत असते. या उत्पादनांना ग्राहकांकडून मागणेदेखील आहे. परंतु असलेल्या दुकानांच्या शेल्फवर त्या उत्पादनांसाठी जागाच नाहीये. त्यामुळे तुम्हांला तुमच्या दुकानांतून पितांबरीच्या नवीन व जुन्या उत्पादनांच्या विक्रीवाढीला वाव आहे.

गेले ३० वर्षे अविरत कार्य करून १ करोड पेक्षा जास्त समाधानी ग्राहक पीतांबरीशी जोडले गेले आहेत. ५५ उत्पादने व त्यांचे १५० उपप्रकार यांमुळे ग्राहकाला विकत घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय मिळतात व त्यामुळे विक्री करणे सुलभ होते.

जर तुम्हांला काही नवीन करण्याची इच्छा असेलआणि एका ख्यातनाम ब्रँडसोबत जोडले जाण्याची संधी घ्यायची असेल, तर आजच संपर्क करा.